Marathi News> मुंबई
Advertisement

ED Notice : भाजप ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय - संजय राऊत

ईडीची (ED Notice) कुठलीही नोटीस अजून आलेली नाही. मात्र, नोटीस शोधायला भाजप  (BJP) ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय, असे शिवसेना (Shiv Sena) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanyaj Raut) यांनी म्हटले आहे. 

ED Notice : भाजप ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय - संजय राऊत

मुंबई : ईडीची (ED Notice) कुठलीही नोटीस अजून आलेली नाही. मात्र, नोटीस शोधायला भाजप  (BJP) ऑफिसमध्ये माणूस पाठवलाय, असे शिवसेना (Shiv Sena) नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. हे सगळं राजकारण आहे. ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करू दे. PMC बँक घोटाळ्याप्रकरणी राऊतांच्या पत्नीला ईडीने समन्स पाठविल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांसोबत बोलताना भाजपवर निशाणा साधला. मी काही सांगत नसून सगळे भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचे सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेले नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल, असा टोला त्यांनी लगावला.

भाजप कार्यालयातून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल तर पाहून घेऊ, असा टोला त्यांनी लगावला आहे.हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात, असेही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं.  मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे,  अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

दरम्यान, 'केवळ राजकारणातून ईडीची नोटीस आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. महाविकास आघाडी कशालाही घाबरत नाही. केवळ राजकारणातून ईडीची नोटीस आहे. आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठवलेल्या नोटीसीवर आपली प्रतिक्रिया दिली.

Read More