Marathi News> मुंबई
Advertisement

म्हणून तळीरामांचा ओढा आता या प्रकारच्या दारूकडे जास्त....

दारूसाठी मुंबई पुण्यात तुम्ही रांगा लागलेल्या सोशल मीडियात आणि टीव्हीवर पाहिलं असेल.

म्हणून तळीरामांचा ओढा आता या प्रकारच्या दारूकडे जास्त....

मुंबई : दारूसाठी मुंबई पुण्यात तुम्ही रांगा लागलेल्या सोशल मीडियात आणि टीव्हीवर पाहिलं असेल. पण महाराष्ट्रात मोठी शहरं सोडली तर चित्र जरा वेगळंच होत चाललं आहे. तळीरामांनी दारू मिळत नाही म्हणून थेट तालुक्यावरून गाव खेड्यात गावठी दारू रिचवणे सुरू केले आहे.

पण ज्या तालुक्यांच्या शहरांमध्ये संक्रमित रूग्ण आहेत, अशा निमशहरी भागातून तळीराम गावठी दारू पिण्यासाठी खेड्यांमध्ये येत असल्याने, गावकऱयांनी कोरोनाचा फैलाव खेड्यात होण्याची भीती व्यक्त केली आहे.

दुसरीकडे खेडोपाडी गावठी दारू विक्री वाढल्याने, गावठी दारू विक्रेत्यांचं चांगलंच फावलं आहे. कारण ही दारू देखील आता दुपटीच्या किंमतीत विकली जात आहे.

Read More