Marathi News> मुंबई
Advertisement

Drugs Case : समीर वानखेडे यांच्यावरील चौकशीत मुंबई पोलिसांची एंट्री

ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे ( NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील चौकशीत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एंट्री केली आहे.  

Drugs Case : समीर वानखेडे यांच्यावरील चौकशीत मुंबई पोलिसांची एंट्री

मुंबई : ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे ( NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील चौकशीत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एंट्री केली आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) याला सोडण्यासाठी खंडणीची मागणी केल्याचा गंभीर आरोप ड्रग्ज (Drugs Case) प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने केला आहे. तब्बल 8 तास त्याच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला गेला. त्याने सांगितलेल्या ठिकाणांवर मुंबई पोलीस त्याला घेऊन गेल्याची महिती सूत्रांनी दिली आहे.

ड्रग्स प्रकरणाचा तपास करणाऱ्या समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर हे प्रकरण गंभीर झाले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बर्थ सर्टिफिकेटवरून आता वाद टोकाला गेला आहे. समीर वानखेडे यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  चौकशी करायचीच असेल तर CBI किंवा NIAने करावी, अशी मागणी आता समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. 

कोणतीही तूर्तास कठोर कारवाई करण्यास न्यायालयानं राज्य सरकारला मनाई केली आहे. आलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून वानखेडे यांच्या विरोधात अटकेची कारवाई करायची असेल तर त्यांना त्याची तीन दिवस आधी नोटीस देणे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना बंधनकारक असणार आहे. असे न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबईतील ड्रग्ज पार्टीप्रकरणी चर्चेत आलेला पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) याला कोर्टाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गोसावीचा इतर तपास यंत्रणांनी ताबा मागितल्यास त्याबाबत प्रक्रिया केली जाईल, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे. 

फसवणुकीच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी किरण गोसावी (Kiran Gosavi) याला अटक करण्यापूर्वी, मुंबई ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी म्हणाला की, प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि चॅट्स तपासले पाहिजेत, त्याला किती ऑफर मिळाल्या आहेत. प्रभाकर साईल हा ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक साक्षीदार आहे. त्याच्या चौकशीतून सर्व काही स्पष्ट होईल, असे तो म्हणाला. दरम्यान, प्रभाकर साईल याने 25 कोटी रुपयांचे डील झाल्याचा दावा केला. त्याचवेळी हे डील 18 कोटी रुपयांचे करण्यात आले. यात 8 कोटी हे समीर वानखेडे यांना द्यायचे होते, असा थेट आरोप प्रभाकर याने केला. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. त्यानंतर एनसीबीकडून समीर वानखेडे यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी गेल्या 25 दिवसांपासून जेलमध्ये असलेल्या आर्यन खान याला अखेर मुंबई उच्च न्यायालायने मोठा दिलासा देताना जामीन मंजूर केला. त्यामुळे आर्यनची दिवाळी मन्नतमध्येच साजरी होणार आहे. आर्यनसोबत मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांनाही जामीन देण्यात आला. मात्र आर्यन खानला कालची रात्र आर्थर रोड जेलमध्येच काढावी लागली. कारण कोर्टाची ऑर्डर आज येणार आहे. त्यामुळे ही ऑर्डर आल्यानंतरच आर्यनची आज किंवा उद्या जेलमधून सुटका होणार असल्याची माहिती आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी दिली. 

Read More