Marathi News> मुंबई
Advertisement

3 वर्षांच्या मुलीने गिळलं 5 रुपयाचं नाणं

अन्ननलिका आणि श्वसननलिकेच्या मध्ये हे नाणं अडकलं होतं.

3 वर्षांच्या मुलीने गिळलं 5 रुपयाचं नाणं

मुंबई : घरात एखादं लहान मुलं म्हटलं की अगदी डोळ्यात तेल घालून त्याकडे लक्ष ठेवावं लागतं. ते बाळं कुठे धडपडणार तर नाही ना किंवा नकळत काही तोंडात तर घालत नाही ना? इथपासून ते अगदी खेळताना मध्येच शांत का होतंय? इथपर्यंत सगळीकडेच लक्ष ठेवावं लागतं. 

लहान मुलं घरी असेल तर सगळ्याच मोठ्या माणसांची तारांबळ उडते. असं असताना अचानक त्या लहान मुलाने तोंडात काही घातलं तर मग झालं. सगळ्यांचीच पंचाईत. असंच काहीस दहिसरमध्ये राहणाऱ्या मोरे कुटुंबियांच्या घरी घडलं आहे. तीन वर्षांच्या नंदीता मोरेने खेळत असताना घरात 5 रुपयांच नाणं गिळलं आणि सगळीकडे एकच गोंधळ झाला. 

जमिनीवर पडलेले नाणं नंदिताने गिळलं त्यानंतर तिला बोलायला आणि श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. कुटुंबियांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी तिला तात्काळ बोरिवलीच्या ऍपेक्स सुपर स्पेशालिटी रूग्णालयात हलवलं. तपासादरम्यान लक्षात आलं की, तिने 5 रुपयांच नाणं घशात अडकलं आहे. 

डॉक्टरांनी माय मेडिकल मंत्रला दिलेल्या माहितीनुसार, अन्ननलिका आणि श्वसननलिकेच्या मध्ये हे नाणं अडकलं होतं. तातडीने उपचार करणं आवश्यक होतं त्यामुळे दुर्बिणीच्या सहाय्याने हे नाणं बाहेर काढण्यात आलं. आता या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Read More