Marathi News> मुंबई
Advertisement

कोरोनाकाळात तृतीयपथींयांना मदतीचा हात, रेशन किटचं वाटप

आर्थिक मंदीच्या काळात मदतीचा हात 

कोरोनाकाळात तृतीयपथींयांना मदतीचा हात, रेशन किटचं वाटप

मुंबई : मुकूल मादव फाऊंडेशन, फिनोलेक्स पाइप्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि माणिकबेन नानावटी कापडिया महिला विद्यापीठाने 22 जून रोजी तृतीयपंथींना रेशन किटचे वाटप केले. कोरोनाच्या काळात अनेकांवर आर्थिक मंदीचं सावट ओढवलं आहे. असं असताना 100 तृतीयपंथींना रेशन किटचे वाटप करण्यात आले. 

fallbacks

यावेळी मुख्याध्यापक डॉ. राजेशी त्रिवेदी आणि शिक्षक, विद्यार्थी तसेच प्राध्यापक डॉ. स्वाती यांच्यासह राहत कमिटीचे स्वयंसेवक देखील उपस्थित होते. 

fallbacks

अ‍ॅड गौरी छाब्रिया यांनी मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधित्व करून आणि स्वागत भाषणही केले. मुकुल माधव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितु छाब्रिया आणि फिनोलेक्स पाईप्सचे संचालक श्रीमंत यांनी घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.

fallbacks

तुमच्या सर्वांना आनंदासाठी आणि सन्मानासाठी हे किट दिल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून खूप समाधान वाटले. 

fallbacks

यावेळी तेथे लायन्स क्लबचे गेस्ट ऑफ ऑनर, डॉ विजय जेसानी अध्यक्ष, शेर अमर मांझियार उपस्थित होते.

fallbacks
या महामारीच्या काळात मानवतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. या स्तुत्य उपक्रमाबद्दल पाठिंबा दिल्याबद्दल प्राचार्यांचे आभार मानण्यात आले. 

Read More