Marathi News> मुंबई
Advertisement

धनंजय मुंडे यांच्याबाबत संपूर्ण पोलीस चौकशीनंतर निर्णय - शरद पवार

राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. मात्र...

धनंजय मुंडे यांच्याबाबत संपूर्ण पोलीस चौकशीनंतर निर्णय - शरद पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. मात्र, हे आरोप करणाऱ्या व्यक्तीविषयी त्यानंतर अन्य काही गोष्टी पुढे आल्यात. आता ही बाब पोलिसात गेली आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतर (police inquiry) काय तो निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरले आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मीडियाशी बोलताना दिली. त्यामुळे तूर्तास धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपानंतर राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काल शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितेल की, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाचे स्वरुप गंभीर आहेत. पक्ष म्हणून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याची उत्सुकता होती. मात्र, या प्रकरणाला वेगळे वळण लागल्यानंतर पवार यांनीही सावध भूमिका घेतली आहे. एका महिलेने आरोप केल्यानंतर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची चौकशी पोलीस संपूर्ण चौकशी करतील.

तसेच धनंजय मुंडे हे मला स्वत: भेटले. यावेळी त्यांनी प्रकरणाची संपूर्ण माहिती मला दिली, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले. तसेच तक्रारीचे स्वरुप गंभीर आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर त्या महिलेले तक्रार दाखल केल्यानंतर वेगळीच माहीती मीडियाच्यामाध्यमातून पुढे आली आहे. त्यामुळे आता पोलीस चौकशी करतील. त्यानंतर पुढील पाऊल उचलेल जाईल, असे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले आहेत.

मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही!

रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी पक्षाची भूमिका आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी इथल्या निवासस्थानी पार पडलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला धनंजय मुंडेही उपस्थित होते. बैठकीला अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. धनंजय मुंडे तसंच नबाब मलिक प्रकरणावर बैठकीत चर्चा झाली. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा विरोधातच ब्लॅकमेलिंगच्या ३ तक्रारी आल्यानं धनंजय मुंडे सेफ आहेत. 

Read More