Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात

 मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपने आपली ताकद पणाला लावली  होती. 

मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात

मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, आणि कोकण पदवीधरच्या मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची आज मतमोजणी आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना आणि भाजपने आपली ताकद पणाला लावली  होती. भाजपकडून अमितकुमार मेहता आणि शिवसेनेकडून विलास पोतनीस तर स्वाभिमानकडून राजू बंडगर तर अपक्ष म्हणून दीपक पवार रिंगणात होते.

यांच्यामध्ये चुरस 

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगे, लोकभारतीचे कपील पाटील आणि भाजप पुरस्कृत अपक्ष अनिल देशमुख यांच्यात लढत रंगली. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरे, राष्ट्रवादीकडून नजीब मुल्ला, तर शिवसेनेकडून संजय मोरे रिंगणात होते. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे अनिकेत पाटील , शिवसेनेतर्फे किशोर दराडे तर राष्ट्रवादीतर्फे संदीप त्र्यंबक बेडसे आणि प्रतापदादा सोनावणे यांच्यात चुरस झाली होती. 

Read More