Marathi News> मुंबई
Advertisement

Coronavirus : मुंबईत १४ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण

एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं

Coronavirus : मुंबईत १४ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोनाचे २२ नविन रुग्णांची नोंद झाली असून मुंबईत १५कोरोनाची नवीन रूग्ण सापडले आहे.  त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाचा देखील समावेश आहे. दरम्यान, करोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. 

राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा रविवारी के ई एम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती करोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोनामुळे झाला तो मधुमेही होता.  कोरोनामुळे मृत पावलेल्या आठव्या रुग्णाचे वय फक्त ४५ वर्ष होते. तर मुंबईबाहेरचा हा पहिलाच मृत्यू आहे. शनिवारी सकाळी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेट केलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. सदर रुग्णाला न्यूमोनियाचा त्रास वाढल्यामुळे खाजगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र नागपूर येथे पाठवलेल्या रिपोर्ट मध्ये या मृत्यू झालेल्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

हा रुग्ण परदेशातून आला नव्हता किंवा त्याने कोणत्याही प्रकारचा दौरा देखील केला नव्हता. २ दिवस त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला न्यूमोनियाचा त्रास वाढल्यामुळे खाजगी रुग्णालयातून सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो २ तासांतच मृत पावल्याची माहिती डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. शिवाय हा रुग्ण कोणा-कोणाच्या  संपर्कात आला होता याचा देखील तपास घेत असल्याचं डॉ प्रेमचंद पंडित यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील करोना बाधित एकूण मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे. 

Read More