Marathi News> मुंबई
Advertisement

Britain: किंग चार्ल्सचा राज्याभिषेक सोहळा; मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठवला 2.23 किलोचा राजमुकूट

ब्रिटन राजघराण्याच्या प्रत्येक सुख:दुखात मुंबईचा डबेवाला सहभागी होत आला आहे. प्रिन्स चार्ल्स यांच्या मुलाच्या लग्नात मुंबईच्या डबेवाल्यांनी आहेर पाठवला होता. तर,  प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले तेव्हा त्यांच्या नातवाला गंठन, वाळे, काकंण, कमर साखळी असे दागिणे पाठवले होते.

Britain: किंग चार्ल्सचा राज्याभिषेक सोहळा; मुंबईच्या डबेवाल्यांनी पाठवला 2.23 किलोचा राजमुकूट

Britain King Charles III Coronation: ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे (Britain King Charles III)यांचा राज्याभिषेक सोहळा (Coronation)  हा 6 मे रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याची ब्रिटनमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. मुंबईचे  डबेवाले (Mumbai Dabbawala) देखील या सोहळ्याची खास तयारी करत आहेत. या राज्यभिषेक सोहळ्यासाठी जगभरातून अनेक नामवंत व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. त्यात अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बिडेन आणि भारताचे उपाध्यक्ष जगदीप धनखर यांचाही समावेश आहे. या व्यतीरीक्त मुंबईतील प्रसिद्ध डबेवाले यांना देखील याचे निमंत्रण पाठवले आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचे  राजा चार्ल्स यांच्याशी खास नाते आहे. 

ब्रिटन राजघराण्याच्या प्रत्येक सुख:दुखात मुंबईचा डबेवाला सहभागी होत आला आहे. प्रिन्स चार्ल्स यांच्या मुलाच्या लग्नात मुंबईच्या डबेवाल्यांनी आहेर पाठवला होता. तर,  प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले तेव्हा त्यांच्या नातवाला गंठन, वाळे, काकंण, कमर साखळी असे दागिणे पाठवले होते.

फक्त सुखातच नाही तर राणी एलिजाबेथ यांचे निधन झाले तेव्हा डबेवाले त्यांच्या दु:खात सहभागी झाले होते.  राणीच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स राजा झाले आनंद देखील डबेवाल्यांनी साजरा केला होता. 

डबेवाल्यांतर्फे राज्याभिषेकासाठी खास मुकूट

6 मे रोजी राजा चार्ल्स याचा राज्यभिषेक होत आहे. या राज्यभषेकात त्यांच्या डोक्यावर  2.23 किलो सोन्याचा मुकूट घातला जाणार आहे. याचा आम्हाला आनंद आहे. म्हणुन आम्ही ही त्यांना पंचधातुचा सोनेरी मुकूट भेट पाठवत आहोत. सदरचा मुकूट डबेवाल्याच्या कामवर पी.एच.डी. करणारे डॅा. पवन अग्रवाल यांनी दिला आहे असल्याची माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. 

पुणेरी पगडी आणि वारकरी समाजाची शाल अशा अनेक वस्तू मुंबईतील डबेवाल्यांनी राजा चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांना  भेट देण्यासाठी खरेदी केल्या आहेत. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

राणीच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांनी राज्याभिषेक 

8 सप्टेंबर 2022 रोजी राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांनी जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर दोन दिवसांनी 10 सप्टेंबर रोजी अधिकृत राज्याभिषेक प्रक्रिया सुरू झाली. या दिवशी किंग चार्ल्स तिसरा ब्रिटनचा नवीन राजा म्हणून घोषित करण्यासाठी सेंट जेम्स पॅलेसमध्ये प्रवेश परिषदेची बैठक झाली. किंग चार्ल्स III चा राज्याभिषेक सोहळा लंडनच्या वेळेनुसार सकाळी 11 वाजता (भारतीय वेळेनुसार PM 4:30) सुरू होईल. या  राज्याभिषेक सोहळ्यासाठी 1021.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. ट्रुमन क्रूझ आणि कॅटी पेरी यांसारख्या स्टार्सच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला शोभणारी सोनम एकमेव भारतीय सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. सोनम कपूर राज्याभिषेक कार्यक्रमात कॉमनवेल्थ व्हर्च्युअल कॉयरची ओळख करून देणार आहे. 

Read More