Marathi News> मुंबई
Advertisement

कल्याण-डोंबिवलीमध्येही लॉकडाऊन वाढवला

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्येही लॉकडाऊन वाढवला

कल्याण : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. याआधी कल्याण डोंबिवलीमध्ये २ जुलै ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन होता. आता हाच लॉकडाऊन १२ जुलै सकाळी ७ वाजल्यापासून १९ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. 

लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिल्याप्रमाणेच सगळे नियम लागू राहतील, असंही महापालिका आयुक्तांनी सांगितलं आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे २ जुलैपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण लॉकडाऊनच्या या काळातही कोरोना रुग्णांच्या वाढीचं प्रमाण आटोक्यात आलं नाही, त्यामुळे पुन्हा हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठाण्यातला लॉकडाऊन पुन्हा वाढवला

दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीप्रमाणेच ठाण्यामध्येही १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर पुण्यामध्येही पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून म्हणजे १४ जुलैपासून १० दिवसांसासाठी पुणे जिल्हा लॉकडाऊन करण्यात येईल.

पुण्यातही पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय

Read More