Marathi News> मुंबई
Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव : आता पोलीस करणार वर्क फ्रॉम होम

Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाविकास आघाडी सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव : आता पोलीस करणार वर्क फ्रॉम होम

मुंबई : Coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाविकास आघाडी सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ज्या  ठिकाणी कोरोनाचा जास्त धोका आहे, तेथील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पोलीस कर्मचारी वर्क फ्रॉम होम (work from home) करणार आहेत. (Corona outbreak: Police will now do work form home)

राज्यात कोरोना (Maharashtra Corona) संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा 25 हजारांच्यावर गेला आहे. त्यामुळे आता गृह विभागाने पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू केले आहे.

पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (work from home) करता येणार आहे. तसा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात मुंबईत मोठी घोषणा केली आहे. कोरोना काळात पोलिसांची महत्वाची भूमिका राहिली आहे. आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पोलिसांनाही धोका पोहोचू शकतो. याआधी पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. त्यामुळे  वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतला आहे.

 मुंबईतही गेल्या 24 तासांमध्ये 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने 55 वर्षांवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचा आदेश लागू केला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Read More