Marathi News> मुंबई
Advertisement

Corona Update : राज्यात कोरोनाचा विस्फोट, मुंबईत रुग्णसंख्येने ओलांडला हजारचा आकडा

राज्यात पुन्हा कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत असून आज गेल्या दोन महिन्यातील उच्चांक

Corona Update : राज्यात कोरोनाचा विस्फोट, मुंबईत रुग्णसंख्येने ओलांडला हजारचा आकडा

मुंबई : आता बातमी राज्यातील नागरिकांची चिंता वाढवणारी. राज्यासह मुंबईत कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा  आकडा सातत्याने हजारापेक्षा जास्त आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासात 1 हजार 881 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही उच्चांक रुग्णसंख्या ठरली आहे. राज्यात आज 878 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.02 इतका आहे.  चांगली बाब म्हणजे राज्यात आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. 

राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत मात्र वाढ झाली आहे. सध्या राज्यात 8432 सक्रिय रुग्ण आहेत. 

मुंबईत सर्वाधिक रुग्ण
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत शहरात आहेत. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 5974 सक्रिय रुग्ण आहेत. 

कोरोनाचे रुग्ण तरुण वयोगटातील 
कोरोनाचे नवे रुग्ण हे 35 ते 45 वर्षे वयोगटातील असल्याचं दिसून येत आहे. (Corona cases, youth, Mask use) तिशी ओलांडलेल्या वयोगटामध्ये संसर्गाचं प्रमाण पाहता सध्या सार्वजनिक आणि खासगी रूग्णालयात कोरोनाचे उपचार घेणाऱ्या तरूणांची संख्या अधिक आहे. 

कोरोनाच्या संसर्गाचं हे रुप पाहता सार्वजनिक ठिकाणी वावरताना तरूणांनी मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या कारणांनी बाहेर जाणाऱ्या, प्रवास करणाऱ्या, तसंच गर्दीत वावरणाऱ्या वयोगटात या विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून आलं आहे.

Read More