Marathi News> मुंबई
Advertisement

कॉर्डेलिया क्रुजमध्ये NCBच्या कारवाईबाबत कंपनीची बाजू समोर; जाणून घ्या काय म्हटले

एनसीबी (NCB)च्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला तेव्हा क्रुज प्रबंधन आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले. क्रुजचा कोणताही कर्मचारी किंवा चालकाचा या ड्रग्सच्या प्रकरणाशी  संबध आढळून आला नाही

कॉर्डेलिया क्रुजमध्ये NCBच्या कारवाईबाबत कंपनीची बाजू समोर; जाणून घ्या काय म्हटले

मुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) टीमने मुंबई पोर्टमध्ये कॉर्डेलिया क्रुजमध्ये (Cordelia Cruise)छापा टाकला. या दरम्यान कथित ड्रग सापडल्याचे सांगण्यात आले होते.  या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

कंपनीची प्रतिक्रिया
कॉर्डेलिया क्रुजचे कंपनी प्रेसिडेंट आणि सीईओ जरगेन बेलम (Jurgen Bailom) यांनी म्हटले आहे की, नॉर्कोटिक्स डिपार्टमेंटला काही प्रवाशांच्या सामानात ड्रग्स आढळून आले. या प्रवाशांना तत्काळ क्रुजमधून बाहेर काढण्यात आले आहे. या प्रवाशांमुळे आमची क्रुज उशीरा निघाली.
त्यांनी म्हटले की, प्रवाशांकडे ड्रग्स आढळून आल्यानंतर इतर लोकांचे स्टेज शो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या गोष्टी, गरबा डान्स तसेच जहाजावर होणारे प्रोग्रामसह अनेक प्रकारच्या सुविधा देण्यातही उशीर झाला. त्यामुळे इतर प्रवाशांची आम्ही माफी मागतो.

जेव्हा एनसीबी (NCB)च्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला तेव्हा क्रुज प्रबंधन आणि कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले. क्रुजचा कोणताही कर्मचारी किंवा चालकाचा या ड्रग्सच्या प्रकरणाशी  संबध आढळून आला नाही. सांगितले जात आहे की, पुरेशी चौकशी आणि माहितीनंतर जहाजाला रवाना करण्यात आले.

Read More