Marathi News> मुंबई
Advertisement

धुळे, जालना, बुलढाणा जिल्ह्यात गारपीट

रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, तसेच अचानक थंडीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

धुळे, जालना, बुलढाणा जिल्ह्यात गारपीट

मुंबई : धुळे आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, तसेच अचानक थंडीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

खान्देश, मराठवाडा, जालन्यात गारपीट

खान्देशातील धुळ्यात गारपीट झाली आहे, तर मराठवाड्यातील जालनामध्येही गारपीट झाली आहे. विदर्भातील बुलढाण्यालाही गारपीटीचा फटका बसला आहे.

गहू, कांदा, हरभरा पिकाचं नुकसान

हवामान खात्याने यापूर्वीच गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. या गारपीटमुळे गहू, कांदा, हरभरा या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 

पावसाएवढंच गारपीटीचं प्रमाण

जालना आणि धुळ्यात गारपीट झाल्यामुळे काही भागात खच पडला होता. कृषी विभागाने यापूर्वीच पिकांची काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं, यात त्यांनी गारपीटनंतर येणाऱ्या रोगांसाठी नेमक्या कोणत्या उपाय योजना कराव्यात याविषयी माहिती दिली आहे.

Read More