Marathi News> मुंबई
Advertisement

महानगरकडून पीएनजी, सीएनजीच्या दरांत वाढ, नवे दर आजपासून लागू

CNG, PNG prices : महागाईचा भडक्यात अधिक भर पडली आहे. कारण सरकारने उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती वाढवल्या.  

महानगरकडून पीएनजी, सीएनजीच्या दरांत वाढ, नवे दर आजपासून लागू

मुंबई : CNG, PNG prices : महागाईचा भडक्यात अधिक भर पडली आहे. कारण सरकारने उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती वाढवल्या. त्यामुळे सीएनजी पीएनजी दरांत वाढ झाली असून आजपासून महानगरकडून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. ((CNG, PNG prices to rise sharply as  gas price increased) पीएनजी दरांत प्रतिकिलो 1 रूपये दरवाढ तर सीएनजी प्रतिकिलो 2 रूपये दरवाढ करण्यात आली आहे.  

नॅचरल गॅसच्या किंमतीत केंद्र सरकारने 62 टक्के वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर महानगर गॅसने सीएनजी पीएनजी दरात वाढ केली आहे. (CNG, PNG prices to rise sharply as  gas price increased by 62%) सीएनजीच्या दरांत एक रूपयाने तर पीएनजीच्या दरात दोन रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. 

ही दरवाढ आजपासून लागू झाली. वाहनांसाठी सीएनजी वापरला जातो. तर घरगुती वापरासाठी पीएनजी पाईपच्या माध्यमातून पुरवला जात आहे. त्यामुळे या दरवाढीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Read More