Marathi News> मुंबई
Advertisement

'शिवरायांच्या स्मारकाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा अडथळा'

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाला मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचा अडथळा दिसून येत आहे.  

'शिवरायांच्या स्मारकाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा अडथळा'

मुंबई : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाला मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचा अडथळा दिसून येत आहे. तसा आरोप स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला आहे. सव्वा तीन वर्षांनंतरही सरकार शब्द पाळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी हा आरोप करताना ठेवलाय.

प्रशासनावर गंभीर आरोप 

शिवजयंतीच्या दुसऱ्याच दिवशी अरबी समुद्रात शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनी सरकार आणि प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. निविदा उघडून एक वर्ष पूर्ण झालं, तरी दिव्य स्मारकाच्या कामाला वेग आलेला नाही. आम्ही त्यात कमी पडलो, अशी कबुली त्यांनी दिलेय.

अधिकारी अडथळे आणतायेत

स्मारकाच्या कामात मंत्रालयातले अधिकारी अडथळे आणत असल्याचं मेटेंनी म्हटलंय. दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घ्यावी, अशी विनंती करणार असल्याचं मेटेंनी म्हटलंय. शिवाय समितीला राज्यमंत्रीपदाचे अधिकार देण्यात आलेले नसल्याचंही मेंटेंनी स्पष्ट केलंय.

Read More