Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचा

Mumbai Central Railway Mega Block News: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे. 

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचा

Mumbai Central Railway Mega Block Latest Updates: शुक्रवार 30 मे रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी 2 जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्य रेल्वेने घोषित केला आहे. ब्लॉक वेळात एकूण 956 अर्थात 23 टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. तब्बल 63 तास मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी हा मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या मेगाब्लॉकमुळं लोकलचे वेळापत्रक बदलणार असून नागरिकांचेही वेळापत्रक कोलमडणार आहे. 

मध्यरात्री 30/31 (गुरुवारी-शुक्रवारी) ते 2 जून च्या दुपारपर्यंत प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी मध्य रेल्वेवर ठाणे स्थानकात 63 तासांचा विशेष मेगा ब्लॉक तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 36 तासांचा विशेष ब्लॉक आयोजित करण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान प्लॅटफॉर्मच रुंदीकरण तसेच फलाटाची लांबी जाणार वाढवली आहे. 63 तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाच आणि सहा च्या रुंदीकरणाचं काम करण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील 36 तासांच्या विशेष ब्लॉक दरम्यान फलाट क्रमांक 10 आणि 11 वर २४ डब्यांच्या गाड्या थांबवण्याच्या अनुषंगाने फलाटाची लांबी वाढवली जाणार आहे. 

- ठाणे स्थानकात डाऊन फास्ट मार्गावर 63 तासांचा विशेष ब्लॉक असेल ३०/३१ च्या मध्यरात्री १२.३० पासून ते २ जुन दुपारी ३.३० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल 

- छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील 36 तासांचा ब्लॉक ३१/१ च्या मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होणार असून २ जुने दुपारी १२.३० पर्यंत असेल

- 930 लोकल सेवा रद्द  तर ४४४ गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार तर ४४६ गाड्या शॉर्ट ओरिजिनेट 

- शुक्रवारी १६१ गाड्या (31.5.2024 (Friday))
- शनिवारी ५३४ गाड्या (01.6.2024 (Saturday) )
- रविवारी २३५ गाड्या रद्द (02.6.2024 (Sunday) )

विशेष ब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याच मध्य रेल्वेचं आवाहन. तसंच, विशेष ब्लॉक दरम्यान रेल्वे प्रवास टाळणे तसेच अत्यावश्यक असल्यास प्रवास करण्याचं रेल्वेचं प्रवाशांना आवाहन.

Read More