Marathi News> मुंबई
Advertisement

फरफट सुरुच! मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं आज 534, 37 मेल एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्याआधी वाचा Latest Update

मध्य रेल्वेचा गुरुवारी रात्री सुरु झालेला 63 तासांचा मेगाब्लॉक आजही सुरुच असणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम शुक्रवारी पाहायला मिळाला. यामुळे तब्बल 200 लोकल सेवा रद्द करण्यात आला. पण ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम हा शनिवारी दिसून येणार आहे. 

फरफट सुरुच! मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं आज 534, 37 मेल एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्याआधी वाचा Latest Update

गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून 63 तासांचा मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु झाला आहे. शुक्रवारी आणि आज शनिवारी अनेकांना सुट्टी मिळालेली नाही. यामुळे कामावर जाण्यासाठी अनेकांना उलटा आणि दगदगीचा प्रवास प्रवाशांना करावा लागणार आहे. कल्याण-कसारा-कर्जत दिशेकडील कर्मचाऱ्यांना सीएसएमटी गाठण्यासाठी दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करून चर्चगेटपर्यंत पोहोचावे लागणार आहे.

या कारणामुळे मेगाब्लॉक 

गुरुवारी रात्रीपासून सुरु झालेला हा मेगाब्लॉक 2 जूनपर्यंत असणार आहे. यामागे महत्त्वाचं कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक 10-11 च्या लांबीकरणाचं काम सुरु आहे. या फलाट क्रमांकावरुन 24 डब्यांच्या प्रवासी गाड्या जाण्यासाठी फलाटाची लांबी वाढवणे आवश्यक होते.  ब्लॉकचा शेवटचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर सुरू झाला आहे. रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंत लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉकवेळेत सिग्नलसंबंधी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. 

खासगी सरकारी कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र 1 जून रोजी पहिला शनिवार असल्याने कर्मचाऱ्यांना कामावर जावं लागणार आहे. शनिवारी सुट्टी न मिळालेल्या प्रवाशांना अगदी फरपट करुन कामावर जावं लागणार आहे. कर्जत-कसारावरुन येणाऱ्या प्रवाशी दादर-चर्चगेट करुन सीएसएमटी गाठणार आहे.  हार्बरमार्गे येणाऱ्या प्रवाशांना वडाळा रोड स्थानकात उतरून बस-टॅक्सीच्या मदतीने कार्यालयात गाढत आहे. 

प्रवास टाळण्याचे आवाहन

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी आणि ठाणे ब्लॉक वेळेत रेल्वे स्थानकातील प्रवासी गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक असेल तरच रेल्वे प्रवास करावा, शक्य असल्यास रेल्वे प्रवास टाळावा. आज आणि उद्या शनिवार आणि रविवारचं म्हणजे सुट्टीच्या दिवसांचे वेळापत्रकानुसार लोकल धावणार आहे. यामुळे 534 लोकल आणि 37 मेल एक्सप्रेस रद्द करणार आहोत.

या कारणामुळे मेगाब्लॉक 

गुरुवारी रात्रीपासून सुरु झालेला हा मेगाब्लॉक 2 जूनपर्यंत असणार आहे. यामागे महत्त्वाचं कारण आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक 10-11 च्या लांबीकरणाचं काम सुरु आहे. या फलाट क्रमांकावरुन 24 डब्यांच्या प्रवासी गाड्या जाण्यासाठी फलाटाची लांबी वाढवणे आवश्यक होते.  ब्लॉकचा शेवटचा टप्पा शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर सुरू झाला आहे. रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत असलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोडपर्यंत लोकल बंद राहणार आहेत. ब्लॉकवेळेत सिग्नलसंबंधी तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. 

मध्य रेल्वेचाही मेगाब्लॉक

 या दरम्यान आता पश्चिम रेल्वेद्वारे चर्चगेट ते मुंबई सेंट्रलचा रविवारी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. सीएसएमटीवर ब्लॉक असल्यामुळे प्रवाशी चर्चगेटवरुन सहज प्रवास करुन सीएसमएमटीपर्यंत पोहोचत होते. पण आता पश्चिम रेल्वेचा रविवारी सकाळी 10.35 ते 3.35पर्यंत असणार अशी घोषणा केली आहे. यामुळे आता प्रवाशांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

Read More