Marathi News> मुंबई
Advertisement

ब्रेकिंग : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा सुरू होणार; महत्वाचे मुद्दे

या अटी आणि नियमांनुसार धावणार लोकल 

ब्रेकिंग : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकल पुन्हा सुरू होणार; महत्वाचे मुद्दे

मुंबई : एवढ्या दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई लोकल सोमवारपासून धावणार आहे. पण लोकल ट्रेन फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार आहे. रेल्वेकडून रविवारी रात्री उशिरा अधिकृत माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे 

  • पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२० पासून ही सेवा सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून ७३ फेऱ्या होणार आहेत. यातील ८ फेर्या या विवार आणि डहाणू मार्गे धावणार आहे. या रेल्वेतून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे. 
  • या लोकल सकाळी ५.३० ते रात्री ११.३०पर्यंत धावणार आहेत. यामध्ये १५ मिनिटांची विश्रांती घेतली जाईल. 
  • महत्वाच्या फेऱ्या या चर्चगेट ते विरार या स्टेशनांमध्ये होणार आहे. पण काही लोकल मात्र डहाणूवरून ही धावतील. 
  • या लोकल सेवा पश्चिम मार्गावर जलद गतीने धावतील. चर्चगेट ते बोरिवली अशी जलद लोकल असे ती लोकल बोरिवलीच्या पुढे धीम्या गतीने धावेल. 

मध्य रेल्वे 

  • मध्य रेल्वेच्या मार्गावर देखील फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लोकल धावणार आहे. 
  • या रेल्वे मार्गावर २०० फेऱ्या होणार आहेत. १०० अप आणि १०० डाऊन 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कसारा / कर्जत / कल्याण / ठाणे या मार्गावर १३० फेऱ्या होणार आहे. ६५ अप आणि ६५ डाऊन 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल अशा ७० फेऱ्या होणार आहेत. ३५ अप आणि ३५ धाऊन 
  • जलद लोकल ही फक्त महत्वाच्या स्थानकांवर थांबेल 
  • कामाच्या अनुषंगाने सीएसएमटी येथे अप आणि डाऊन मार्गाची ट्रेनची वेळ शिफ्ट अर्थात ७ तास, ९ तास, १० तास, १५ तास, २१ तास, २३ तास अशी असणार आहे.
  • पश्चिम रेल्वेवर ५० हजार रेल्वे कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील सव्वा लाख‌ कर्मचारी प्रवास करू शकतील
  • राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये सामान्य नागरींना प्रवेश नाकारण्यात येणार आहे.  
  • प्रवास करण्याबरोबरच तिकिट खिडकी देखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच खुली असणार. हे सर्व नियम पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी असणार आहेत.
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल मधून प्रवास करताना ओळख पत्र दाखवण बंधनकारक असणार आहे. प्रवासाकरता योग्य ते तिकिट असणं देखील गरजेचं आहे. 
  • अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची निश्चिती राज्य सरकार करणार आहे. 
  • राज्य सरकारने ठरवलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच‌ प्रवास करता येणार आहे
Read More