Marathi News> मुंबई
Advertisement

उबर ड्रायव्हरने महिलेसोबत केलं असं काही..तिने ट्विटरवर लिहिली कहाणी

प्रियांकाने गोरेगावमधील आरे कॉलनीतून बोरीवलीसाठी उबर राइड बुक केली.

उबर ड्रायव्हरने महिलेसोबत केलं असं काही..तिने ट्विटरवर लिहिली कहाणी

मुंबई : उबर ड्रायव्हरच्या गैरवर्तनामुळे एका महिलेला मनस्ताप सहन करावा लागला. आपली भयावह कहाणी तिने ट्विटरवर शेअर केली आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रियांका सिंहने 4 सप्टेंबरला टॅक्सी प्रोवायडर कंपनी 'उबर'मधून गाडी बुक केली होती. ड्रायव्हरने तिच्यासोबत इतक वाईट वर्तन केलं की तिला आपली कहाणी सांगण्यासाठी सोशल मीडियाची मदत घ्यावी लागली. या घटनेतून सर्वांनी शिकायला हवं. उबर कंपनी, मुंबई पोलीस आणि महिला आयोगाला जागरुक करण्यासाठी तिने ही पोस्ट लिहिली.

उबर ड्रायव्हरचा प्रताप

4 सप्टेंबर 2018 ला प्रियांकाने गोरेगावमधील आरे कॉलनीतून बोरीवलीसाठी उबर राइड बुक केली. गाडीचा ड्रायव्हर सुशांतने आरे कॉलनीतून बाहेर पडल्यावर एका सुनसान जागेवर गाडी थांबवली आणि राइड संपवायला सांगितली. प्रियांकाने त्याला असं करण्याचं कारण विचारल पण त्याने ते सांगण्यास साफ नकार दिला. काळोखामध्ये प्रियांका तिथल्या रस्त्यावर उतरली आणि तिचा पाय खड्ड्यात जाऊन अडकला. तिला गंभीर जखम झाली. मला अंधेरीला सोड असे तिने यावेळी ड्रायव्हला सांगितले पण त्याने काही ऐकल नाही. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांनी तिची मदत केली आणि तिला हॉस्पीटलला नेलं.

पोलिसांचे आभार 

गाडीतील उबर अकाऊंटमध्ये गाडीभाड कॅशमध्ये दिल्याचं दाखवलं जात होतं. पण प्रत्यक्षात असं काही झालं नव्हतं. त्यानंतर प्रियांकाने आपल्यासोबत झालेला किस्सा ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर याप्रकरणाची तात्काळ चौकशी सुरू करण्यासाठी मुंबई पोलिसांचे धन्यवादही मानले. 

Read More