Marathi News> मुंबई
Advertisement

Hospital Bomb Threat: मुंबईतील रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

Mumbai Hospital Received Bomb Threat: मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही तपासासाठी पाचारण केले. हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. 

Hospital Bomb Threat: मुंबईतील रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर

Mumbai Hospital Received Bomb Threat: सोमवारी मुंबईमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. मायानगरी मुंबईमध्ये एका रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीने एकच खळबळ माजली होती. रूग्णालयाला ही धमकी मिळताच पोलीस देखील अलर्टमोडवर आले होते. यानंतर संबंधित रुग्णालय परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही तपासासाठी पाचारण केले. हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. हॉस्पिटलला बॉम्ब ठेवण्याच्या धमकीला मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी दुजोरा दिला.

ताज हॉटेललाही मिळाली होती बॉम्बेने उडवून देण्याची धमकी

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वी मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. यावेळी मुंबई पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून फोन आला होता. ज्यामध्ये ताज हॉटेल आणि शहरातील विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. या धमकीनंतर पोलीस सतर्क झालं मात्र तपासात काहीही आढळून आलं नाही.

मॅकडोनल्डलाही उडवण्याची मिळाली होती धमकी

इतकंच नाही तर गेल्या महिन्यात दादर परिसरात असलेल्या मॅकडोनाल्डलाही बॉम्बची धमकी मिळाली होती. हा फोन मुंबई पोलिसांना आल्याची माहिती आहे. ज्यामध्ये बेस्ट बस क्रमांक 351 मध्ये प्रवास करत असताना एका व्यक्तीने दोन लोक मॅकडोनाल्डला बॉम्बने उडवण्याबाबत बोलताना ऐकलं. त्यानंतर या व्यक्तींना तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच मुंबई पोलीस सतर्क झाले. त्यानंतर रात्रभर बॉम्बचा शोध घेण्यात आला, मात्र पोलिसांना काहीही सापडलं नाही.

Read More