Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबई पालिकेत नवीन पदांची भरती, पदवीधरांना 41 हजारपर्यंत मिळेल पगार

Mumbai Job: मुंबई पालिकेअंतर्गत इन्क्यूबेशन व्यवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे. याच्या पदांच्या प्रत्येकी 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षित 5 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

मुंबई पालिकेत नवीन पदांची भरती, पदवीधरांना 41 हजारपर्यंत मिळेल पगार

BMC Recruitment: मुंबईत चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई पालिकेमध्ये पुन्हा एकदा नवीन पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई पालिकेअंतर्गत इन्क्यूबेशन व्यवस्थापक, लेख आणि वित्त अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे. याच्या पदांच्या प्रत्येकी 1 रिक्त जागा भरली जाणार आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वार्षित 5 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

इन्क्यूबेशन व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकी, अर्थशास्त्र किंवा वाणिज्यमधून पदवी पूर्ण केलेली असावी. उद्योजकता, मार्केटिंग स्पेशलायझेशनमध्ये एमबीए केलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा. 

लेख आणि वित्त अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे चार्टर्ड अकाऊंटंट काम केल्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवारांना संबंधित कामाचा 3 ते 5 वर्षांचा अनुभव असावा. 

fallbacks

'नापास झालीस तर सांगू तिथे लग्न कर', वडिलांच्या अटीनंतर निधी 'अशी' बनली IAS अधिकारी

दोन्ही पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 5 लाखपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांना अंधेरी येथे नोकरी करावी लागणार आहे. 

यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करणे आवश्यक आहे.  इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यांनी आपले अर्ज info.smile@mcgm.gov.in bj पाठवायचे आहेत. 10 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्या. 

आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये बंपर भरती

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यात प्रोजेक्ट इंजिनीअर मॅकेनिकलच्या-1 च्या 17, प्रोजेक्ट इंजिनीअर इलेक्ट्रिकल-1 च्या 4, प्रोजेक्ट ऑफिसर-1 ची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. प्रोजेक्ट इंजिनीअर मॅकेनिकलच्या-1 आणि  प्रोजेक्ट इंजिनीअर इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी पदवी बी.ई./बी.टेक./ बी.एस्सी इंजि. आणि एमबीए पूर्ण असावे. तर प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पूर्णवेळ एमबीए/एमएसडब्ल्यू/पीजीडीएम पूर्ण असणे आवश्यक आहे. 2 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमेटेड, प्लॉट नंबर-1, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, तलोजा, नवी मुंबई- 410 208 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 

Read More