Marathi News> मुंबई
Advertisement

Mumbai Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी

Junior Typist Job: तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी टायपिंग येत असेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Mumbai Job: मुंबई पालिकेत बंपर भरती, टायपिंग येणाऱ्यांना मिळेल भरघोस पगाराची नोकरी

BMC Job: मुंबई महापालिकेत चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी टायपिंग येत असेल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

मुंबई पालिकेत ज्युनिअर टायपिस्टच्या एकूण 226 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे. या भरतीसाठी सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालिन पदवीधरांना आरक्षण देण्यात येणार आहे. अनाथ मुलांसाठी 2 तर दिव्यांगासाठी 9 पदे आरक्षित आहेत. 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

fallbacks

Junior Typist Job: 'असा' करा अर्ज 

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट https://portal.mcgm.gov.in वर जा.

परिपत्रकासोबत जोडलेल्या (HOW TO APPLY) मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. 

इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीला अनुसरून दिलेली अर्हता आणि अटींची पूर्तता होत असल्याची खातरजमा करा. 

नमुन्यातील ऑनलाइन अर्ज ऑनलाइन पद्धतीने, दिलेल्या वेळेत सादर करा.

उमेदवाराने संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा. 

भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, 'ही' घ्या अर्जाची लिंक

अर्ज भरताना उमेदवारांना काही अडचणी असल्यास  9 ते संध्याकाळी 6 या वेळेत  1800222366 / 18001034566 या क्रमांकावर संपर्क साधा. 

आय.बी.पी.एस. या संस्थेच्या वेबसाइटवर 'IBPS Candidate Grievance Redressal System' ही लिंक उपलब्ध असेल. 

ज्युनिअर टायपिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी 15 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून 4 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.  

Bank Job: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती, मुंबईत नोकरी आणि 78 हजारपर्यंत पगार

Read More