Marathi News> मुंबई
Advertisement

BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार

BMC Job 2023 :  मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या सायन रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून भरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख, पत्ता याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार

BMC Job 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी कामाची बातमी आहे. मुंबई पालिकेअंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड होणार आहे. मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या सायन रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून भरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख, पत्ता याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

शीव रुग्णालयाअंतर्गत स्त्री रोग आणि प्रसुती विभागात सहायक प्राध्यापक पदाच्या 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी  मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदविका (एम. डी. पदवी किंवा डी.एन.बी किंवा एम.एस.) असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना एमएस सीआयटीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असलेले उमेदवार अर्ज करु शकतात.

Bank Job: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आठवी ते पदवीधरांना नोकरी, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 38 वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. 

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 580 रुपये अधिक जी.एस.टी. (18% GST)  इतके परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे. 

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच त्यांना मुंबईत नोकरी करावी लागणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी अधिष्ठाता, लो. टि. म स . रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,शीव, मुंबई – 400022 या पत्त्यावर उपस्थित राहावे. याबद्दलची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट www.portal.mcgm.gov.in वर अधिक तपशील देण्यात आला आहे. 

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, पदवीधरांना मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य रेल्वेत नोकरीची संधी 

मध्य रेल्वेच्या भरतीअंतर्गत एकूण 1303 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत  असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजरची रिक्त पदे भरली जातील. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदभरतीसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज पाठविता येणार आहे. संगणक आधारित चाचणी (CBT), अभियोग्यता चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी याआधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी 41 वर्षे, ओबीसीसाठी 46 वर्षे, एससी/एसटी उमेदवारांसाठी 47 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. 3 ऑगस्टपासून ही अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 2 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

Read More