Marathi News> मुंबई
Advertisement

'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

BJP Vijay Sankalpa Melava : लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला.

'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
Kapil Raut|Updated: Jun 13, 2024, 09:46 PM IST

BJP Vijay Sankalpa Melava : लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. या भाजपाच्या (BJP) वाटेला केवळ 9 जागा आल्या. लोकसभेत कमी जागा मिळाल्याचा आढावा घेण्यासाठी आणि तीन महिन्यंवर येऊन घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीसाठी मुंबईत भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन केलं. या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी आता  विजयानंतरच गळ्यात हार घालणार असा निर्धार केलाय. मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात भाजपाचा हा विजय संकल्प मेळावा पार पडला.

'महापालिकेवरही भगवा फडकणार'
विधानसभेची निवडणूक तर आपण जिंकूच मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आज झाली तरी आपलाच भगवा फडकेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजप मेळाव्यात व्यक्त केला. वी आर डाऊन, बट नॉट आऊट असं ते म्हणाले. फेक नरेटीव्हचा पराभव करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं.

महायुतीला मविआपेक्षा जास्त मतं
महायुतीला मुंबईकरांनी 26 लाख मत दिली तर मविआला 24 लाख मत दिली. मराठी माणसाने महाविकास आघाडीने मतदान केलेलं नाही. मविआने फेक नरेटिव्ह तयार केला, त्याला आपण उत्तर देऊ शकलो नाही. किंवा मग आपल्याला समजलं नाही की हे इतकं इफेक्टीव्ह होऊ शकतं. पण फेक नरेटिव्ह एकदा चालतो, सारखा चालत नाही तो बाऊन्स बॅक होतो, 'व्ही आर डाउन बट व्ही आर नॉट आऊट' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. महापालिकेची निवडणूक कधीही होउदे कधीही तिकडे आपला भगवाचं फडकणार आहे, फेक नेरेटिव्हीचा पराभव करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.  तुम्ही सेल्फ स्टार्ट व्हा, आपण जेव्हा जिंकू तेव्हाच हार घालू असा निर्धार फडणवीस यांनी केलाय.

आम्ही डाऊन झालोय, पण आम्ही आउट झालेलो नाही  आता इतिहासात रमून चालणार नाही.  फेक नरेटिव्हचे बारा वाजवायचे असतील तर सेल्फ स्टार्ट द्यायला हवा. आणि त्यासाठी फेक नरेटिव्ह चा पराभव करायचा असेल तर ही निवडणूक जिंकायची आहे क्या हार मे, क्या जित मे, हे आपण स्विकारुन पुढे जावू असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. देशात जितक्या जागा संपूर्ण इंडी आघाडीला मिळाल्या नाही त्यापेक्षा जास्त जागा एकट्या भाजपाच्या आहे. इतिहासातून शिकून पुढे जायचे असते.. याची पहिली संधी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. आपला हा परंपरागत मतदारसंघ होता तो आपण मित्रांना दिला होता आता तो परत घ्यायची संधी आहे.  विधानसभेची निवडणूक तर आपण जिंकूच मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक आज जरी झाली तरी आपलाच भगवा फडकेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केलाय.