Marathi News> मुंबई
Advertisement

मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर भाजप अशी करणार मंत्रिमंडळात भरपाई

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर भाजप अशी करणार मंत्रिमंडळात भरपाई

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत मुख्यमंत्रीपदाचा त्याग केलाय. पण असं असलं तरी खात्यांच्या विभागणीत ते मोठी खात मागू शकतात. 

अर्थ, महसूल आणि गृहखाते भाजपच्या खात्यात राहणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय नगरविकास मंत्रालय आणि रस्ते मंत्रालय एकनाथ शिंदे गटाच्या खात्यात जाऊ शकते. एकनाथ शिंदे स्वतः उद्धव ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्रालय सांभाळत होते. मात्र, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही खात्यांच्या कारभारात ढवळाढवळ करत असल्याने एकनाथ शिंदे नाराज होते. अशा स्थितीत भाजपसोबत सरकार चालवतानाही या दोन खात्यांवर एकनाथ शिंदे यांचा पूर्ण ताबा राहणार का, हे पाहावे लागेल.

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेना वगळता एकूण 39 आमदारांनी त्यांना साथ देत सरकारला पाठिंबा दिला आहे. यातील आठ आमदार मंत्री होते. अशा स्थितीत शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या किती आमदारांना मंत्रिपरिषदेत स्थान मिळते, याकडे लक्ष राहणार आहे. सरकार स्थापनेपूर्वी मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास 13 मंत्रीपदे एकनाथ शिंदे यांच्या खात्यात जाऊ शकतात, अशी चर्चा होती. यापैकी 8 जणांना कॅबिनेट मंत्री तर 5 जणांना राज्यमंत्रिपद दिले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाच्या कोट्यात काही प्रमाणात कपात होऊ शकते.

विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे गटात फूट पडल्याने शिवसेनाच अडचणीत सापडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या शिवसेनेला वाचवण्यासाठी कसरत करत आहेत.

Read More