Marathi News> मुंबई
Advertisement

Uddhav Thackeray: "गाडीवर उभं राहण्याची कॉपी करुन..."; बाळासाहेबांचा फोटो शेअर करत BJP चा उद्धव ठाकरेंना टोला

BJP Slams Uddhav Thackeray Compare him with Balasaheb: उद्धव ठाकरेंनी आज कलानगरमध्ये केलेल्या भाषणाची तुलना बाळासाहेबांच्या एका जुन्या भाषणाची केली जात आहे.

Uddhav Thackeray:

BJP Slams Uddhav Thackeray Car Speech: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आज समर्थकांशी कलानगर चौकामध्ये ओपन जीपमधून संवाद साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्हं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) गटाला देण्याचा जाहीर केला. या निर्णयानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतानाच उद्धव ठाकरेंनी आज 'मातोश्री' या निवासस्थानाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी कलानगरच्या चौकामध्ये संवाद साधला. उद्धव यांच्या या भाषणामधील मुद्द्यांबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या स्थापनेनंतर 1969 साली अशाच प्रकारे गाडीवर उभं राहून भाषण दिल्याची आठवण अनेक ठाकरे समर्थकांना झाली. सोशल मीडियाबरोबर प्रसारमाध्यमांमध्येही बाळासाहेबांच्या त्या भाषणाची आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाची तुलना केली जात आहे. असं असतानाच आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील प्रवक्त्यांनी (BJP Spokesperson) याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

बाळासाहेबांचा आणि उद्धव यांचा फोटो केला शेअर

महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी बाळासाहेबांच्या 1969 सालातील भाषणाचा आणि उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणाचा बाजूबाजूला लावलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना उपाध्ये यांनी बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची तुलना करत माजी मुख्यमंत्र्यांनावर निशाणा साधला.

काय म्हटलंय या ट्वीटमध्ये?

"गाडीवर उभं राहण्याची कॉपी करुन होत नसतं," असं उपाध्ये यांनी ट्वीटच्या पहिल्या ओळीत म्हटलं आहे. पुढे याच ट्वीटमध्ये त्यांनी, "बाळासाहेबांनी दिवसरात्र मेहनत घेतली, कार्यकर्ता जपला, संघटना उभी केली, सत्तेवर शिवसैनिकाला बसवला" असं म्हटलं आहे. पुढे उपाध्ये यांनी उद्धव यांचा उल्लेख 'कॉपीबहीद्दर' असा करत टोला लगावला आहे. "कॉपीबहीद्दर कधी घराच्या बाहेर पडले नाहीत. कार्यकर्त्यांना भेटले नाहीत. उभी संघटना गमावली. विश्वासघाताने स्व:ताच सत्तेवर बसले," असा टोला उपाध्ये यांनी लगावला.

fallbacks

मी खचलेलो नाही

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडणूक आयोग, निवडणूक आयोगाचे आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. उद्धव यांनी आपण खचलेलो नाही. कार्यकर्ते हेच आपली सर्वात मोठी ताकद असून या ताकदीच्या जोरावरच मी लढणार असल्याचं म्हटलं. तसेच उद्धव यांनी आता निवडणुकीच्या तयारीला लागा असं कार्यकर्त्यांना सांगतानाच शिंदेंचा 'चोर' आणि भाजपाचा 'चोरांचे मालक' असा उल्लेख करत टीका केली. पंतप्रधान मोदींच्या नावावर मतं मिळत नाहीत म्हणून त्यांना बाळासाहेबांचा मुखवटा घालून राज्यात यावं लागतं. मात्र खरं कोण आणि मुखवटा कोणाचा हे राज्यातील जनतेचा ठाऊक आहे, असा टोला उद्धव यांनी लगावला.

Read More