Marathi News> मुंबई
Advertisement

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मुनगंटीवारांचं भविष्य

भाजप-शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार आहेत

भाजप-शिवसेनेच्या युतीबाबत मुनगंटीवारांचं भविष्य

मुंबई : भाजप-शिवसेना पुढची निवडणूक एकत्र लढणार आहेत, असा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार विधानसभेत बोलत होते. शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं, याकडे लक्ष देऊ नका, पुढची निवडणूक आम्ही एकत्र लढू, असं मुनगंटीवार विरोधकांना उद्देशून म्हणाले.

मुनगंटीवार यांचा विरोधकांवर निशाणा

उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. पण सत्ता आमचीच येणार, असा टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना हाणला. आमच्यात कितीही वाद झाले तरी आमचं आम्ही बघून घेऊ. काँग्रेस-राष्ट्रवादी १९९९ मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्यामुळे एकत्र आलात. आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ, असं प्रत्युत्तर मुनगंटीवार यांनी विरोधकांना दिलं. अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

शिवसेनेचा स्वबळाचा नारा

२०१९ ची निवडणूक स्वबळावर लढणार असा दावा शिवसेनेनं आधीच केला आहे. त्यामुळे आता मुनगंटीवार यांनी केलेल्या या दाव्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Read More