Marathi News> मुंबई
Advertisement

संजय राऊतांविरोधात राम कदमांचं पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन

संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

संजय राऊतांविरोधात राम कदमांचं पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊंतांविरोधात भाजप आक्रमक झालीय. संजय राऊतांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केलीय. त्यासाठी त्यांनी घाटकोपर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलंय. तसंच संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणीही कदमांनी केलीय. शिवरायांचे वंशज असल्याचा उदयनराजेंनी पुरावा द्यावा असं आव्हान संजय राऊतांनी दिलं होतं. त्यामुळे वाद विकोपाला गेलाय. 

दुसरीकडे, साताऱ्यात संजय राऊत यांच्या छत्रपती घराण्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ उदयनराजे भोसले समर्थक आज निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलक साताऱ्यातील पोवई नाक्यावर उदयनराजे समर्थक निषेध नोंदवणार आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांनी आपल्या जाहीर भाषणात 'उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा दाखवावा' असं वक्तव्य बोलाच्या ओघात केलं होतं. त्यानंतर हा वाद निर्माण झालाय. 

Read More