Marathi News> मुंबई
Advertisement

INS VIKRANT : किरीट सोमय्या यांची 3 तास चौकशी, बाहेर आल्यावर एका वाक्यातच म्हणाले...

आर्थिक गुन्हे शाखेकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांची चार तास चौकशी करण्यात आली

INS VIKRANT : किरीट सोमय्या यांची 3 तास चौकशी, बाहेर आल्यावर एका वाक्यातच म्हणाले...

मुंबई : INS विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची आज आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली. आजपासून पुढील 4 दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 दिवस सोमय्या यांची चौकशी होणार आहे. 

सोमय्यांनी कोर्टात दाखल केलेल्या अटकपूर्व जमीन अर्जावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना अटकेपासून दिलासा दिला. पण  त्याचवेळी विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीचं काय झालं या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किरीट सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.

किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
आर्थिक गुन्हे शाखेकडून किरीट सोमय्या यांची तीन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर बाहेर आलेल्या सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. न्याय देवतेचा आम्ही सन्मान करुया, जी काय माहिती हवी आहे अधिकाऱ्यांना ती आम्ही देत आहोत आणि मला विश्वास आहे सत्याचा विजय होईल, असं उत्तर सोमय्या यांनी दिलं.

संजय राऊत यांची टीका
दरम्यान, या प्रकरणआवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टोला लगावला आहे. ईडीपेक्षा आणचे पोलीस अधिक सक्षम असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणातील सत्य शोधून काढतील, ते ईडीपेक्षा चांगला तपास करतात असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

Read More