Marathi News> मुंबई
Advertisement

Legislative Council Election : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच जणांची यादी जाहीर, तावडे, मुंडे यांना संधी नाहीच

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी भाजपने आज पाच जणांची यादी जाहीर केली आहे. या यादीतून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची नवे वगळण्यात आली आहेत.

Legislative Council Election : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच जणांची यादी जाहीर, तावडे, मुंडे यांना संधी नाहीच

मुंबई : विधान परिषदेची निवडणूक येत २० जूनला होत आहे. या निवडणुकीसाठी केंद्रीय समितीने पाच जणांची नावे निश्चित केली आहेत. मात्र, या यादीतून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, विनोद तावडे यांची नावे वगळण्यात आली आहेत.

विधान परिषदेसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे, प्रसाद लाड या पाच जणांची यादी जाहीर करण्यात आलीय.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

Read More