Marathi News> मुंबई
Advertisement

Big News : राज्यात Swine Flu चा धोका वाढला, तज्ज्ञांच्या 'या' इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका

साथ वाढू लागलीये, इशाऱ्याकडे दुर्लक्ष करु नका, नाहीतर....  

Big News : राज्यात Swine Flu चा धोका वाढला, तज्ज्ञांच्या 'या' इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका

Mumbai Swine Flu : संपूर्ण राज्यासाठी ही महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूची साथ वाढण्याच्या इशारा आरोग्य क्षेत्राती तज्ज्ञांनी दिला आहे. (Big news Ganeshotsav 2022 people rush caused Swine Flu Cases arise in maharashtra)

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या (Mumbai Swine Flu) मुंबईसह राज्यातील (Maharashtra) विविध भागांमध्ये गर्दीचं चित्र पाहायला मिळत आहे. तुलनेनं मुंबईतल्या गर्दीचं प्रमाण अधिक आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्लू पुन्हा एकदा अतिशय वेगानं पसरण्याची भीती व्यक्त गेली जात आहे. 

गेल्या 2 महिन्यान सुमारे 2500 जणांना स्वाईन फ्लूची लागण झालीये, तर 98 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील आठ दिवसांत मुंबईत 300 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली तर, दोघांचा मृत्यू झाला. 

आरोग्य विभागाचा इशारा 
(Swine Flu ) स्वाईन फ्लूचे वाढते रुग्ण पाहता गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असा इशारा आरोग्य विभागानं दिला आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचाही इशारा सध्या देण्यात येत आहे. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, शिंकताना- खोकताना नाका-तोंडावर हात ठेवा, सोबत रुमाल बाळगा. सहव्याधी असणाऱ्यांनी यादरम्यान अधिक काळजी घेणं अपेक्षित आहे.

Read More