Marathi News> मुंबई
Advertisement

बेस्टच्या या २ बस कंडक्टरशिवाय धावणार

मुंबईमध्ये चालणारी बेस्ट बस दोन रूटवर कंडक्टरशिवाय धावणार आहेत. ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

बेस्टच्या या २ बस कंडक्टरशिवाय धावणार

मुंबई : मुंबईमध्ये चालणारी बेस्ट बस दोन रूटवर कंडक्टरशिवाय धावणार आहेत. ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या बसचा नंबर १०० आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत ही बस जाते. दुसऱ्या बसचा क्रमांक १११ आहे. जी चर्चगेटपासून नरीमन पॉईन्टपर्यंत जाते. या दोन्ही बस सकाळी ८ ते रात्री ७.३० पर्यंत धावणार आहेत. या बसला कोणताही कंडक्टर नसेल.

खरंतर हे खूप लहान रूट आहेत. खरंतर या बस पहिल्याच थांब्याला भरतात आणि जास्तत जास्त प्रवासी हे शेवटच्या थांब्याला उतरतात. सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांची एवढी गर्दी असते की,  अनेक जणांना तिकिट देखील घेता येत नाही. कारण कंडक्टर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. यावर असा अंदाज आहे की, १५ टक्के लोक हे विनातिकिट असतात. ये थांबण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

विनावाहक बसमध्ये बस सुरू होण्याआधीच तिकिटं घ्यावी लागतात. बसच्या प्रवेशदारावरचं कंडक्टर असतो, जो सर्व प्रवाशांना तिकिटं देतो. यामुळे विनातिकिट कुणीही बसमध्ये चढू शकत नाही. बेस्ट प्रशासनाला अपेक्षा आहे की, यामुळे रेव्हीन्यू वाढणार आहे, बस कंडक्टरना दुसऱ्या मार्गावर सेवेसाठी पाठवण्यात येणार आहे.

मुंबईत लोकल ट्रेननंतर सर्वात जास्त प्रवासी बेस्टने प्रवास करतात. मुंबईतील ३६०० बस या ४४३ रूटवर चालतात. यात ४० लाखपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. बेस्ट बस चालवण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्टर याशिवाय इतर मिळून एकूण २२ हजार कर्मचारी काम करतात.

Read More