Marathi News> मुंबई
Advertisement

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरीसह 55 हजारपर्यंत पगार; ही संधी सोडू नका

BEL Mumbai Job: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यात प्रोजेक्ट इंजिनीअर मॅकेनिकलच्या-1 च्या 17, प्रोजेक्ट इंजिनीअर इलेक्ट्रिकल-1 च्या 4, प्रोजेक्ट ऑफिसर-1 ची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. 

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये बंपर भरती, मुंबईत नोकरीसह 55 हजारपर्यंत पगार; ही संधी सोडू नका

BEL Recruitment 2023: मुंबईत चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत बंपर भरती सुरु आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40 हजार ते 60 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअरच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यात प्रोजेक्ट इंजिनीअर मॅकेनिकलच्या-1 च्या 17, प्रोजेक्ट इंजिनीअर इलेक्ट्रिकल-1 च्या 4, प्रोजेक्ट ऑफिसर-1 ची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. 

प्रोजेक्ट इंजिनीअर मॅकेनिकलच्या-1 आणि  प्रोजेक्ट इंजिनीअर इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकलमध्ये अभियांत्रिकी पदवी बी.ई./बी.टेक./ बी.एस्सी इंजि. आणि एमबीए पूर्ण असावे. तर प्रोजेक्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पूर्णवेळ एमबीए/एमएसडब्ल्यू/पीजीडीएम पूर्ण असणे आवश्यक आहे. 

यासाठी 32 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत असेल. जनरल/ओबीसी उमेदवारांकजून 472/- रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 

उमेदवारांची निवड ही 3 वर्षांच्या कालावधीसाठी असेल. त्यानंतर प्रकल्पाची आवश्यकता आणि प्रकल्प अभियंता/अधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर ही मुदत एक वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते. निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार ते 55 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. 

2 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज मॅनेजर (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमेटेड, प्लॉट नंबर-1, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, तलोजा, नवी मुंबई- 410 208 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती

एमपीएससी अंतर्गत  महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब च्या एकूण 823 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक (गट-ब) च्या 78 जागा,  राज्य कर निरीक्षक (गट-ब)  च्या 93 जागा, सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) च्या 49 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) च्या 603 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासांठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. 

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2022 रोजी18 ते 38 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ उमेदवारांना यामध्ये 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 544 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग उमेदवारांकडून 344 रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. ही परीक्षा अमरावती, छ.संभाजीनगर , नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे येथील परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. 

Read More