Marathi News> मुंबई
Advertisement

मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप, विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला बदलला

खातेवाटप झालेलं नसलं तरी मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप झालेलं आहे.

मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचं वाटप, विरोधीपक्ष नेत्यांचा बंगला बदलला

मुंबई : खातेवाटप झालेलं नसलं तरी मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप प्राधान्यानं करण्यात आलं आहे. आदित्य ठाकरेंना अ-६ बंगला देण्यात आला आहे. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना दिलेला अ-९ बंगला कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंना देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवगिरी, अशोक चव्हाण यांना मेघदूत, दिलीप वळसे पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सातपुडा तर राजेश टोपे यांना जेतवन हा बंगला मिळाला आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सरकारी बंगल्यांचं ही वाटप झालं. एकूण ३६ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. याआधी छगन भुजबळ यांना रामटेक,  जयंत पाटील यांना सेवासदन आणि एकनाथ शिंदे यांना रॉयलस्टोन बंगले मिळाले आहेत.

आमदार बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर १२०२, विश्वजीत कदम यांना निलांबरी ३०२, सतेज पाटील यांना सुरुची-३, आदिती तटकरे यांना सुनिती -१० हे निवासस्थान मिळालं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना याआधीच सागर हा बंगला देण्यात आला आहे.

fallbacks

 

Read More