Marathi News> मुंबई
Advertisement

नवीन पल्सर लॉन्च : पाहा नवीन फीचर्स आणि किंमत

बजाज पल्सरची 150 cc बाईक ही बाईक प्रेमींची आवडती होती. या कारणाने कंपनीने बजाज पल्सर 150 क्लासिक याबाईकला नवीन अंदाजात सादर केलं आहे.

नवीन पल्सर लॉन्च : पाहा नवीन फीचर्स आणि किंमत

मुंबई :  टू-व्हीलर्सचे निर्माता बजाज कंपनी पुन्हा एक नवीन बाईक घेऊन आली आहे. लोकांची मागणी बघून कंपनीने पल्सर १५० क्लासिक ही बाईक लॅान्च केली आहे. फक्त काळ्या रंगातच नाही, तर पल्सर १५० क्लासिक बाईक आता आणखी 2 रंगात बघायला मिळणार आहे. दोन्ही बाईकला काळ्या रंगासोबत हायलाईट केलं आहे. यात लाल आणि सिल्व्हर रंग पाहायला मिळणार आहे. कोणत्याही रंगाची बाईक एकाच किंमतीत मिळणार आहे. बजाज पल्सर १५० क्लासिकची किंमत ६४ हजार ९९८ (दिल्ली एक्स-शोरूम) आहे. जून २०१८ मध्ये या बाईकला लॅान्च केलं होतं.

नवीन रंगाच्या या बाईकमध्ये हेडलाईट, क्लस्टर, ग्रेब हॅण्डल, रिम टेप आणि साईड पॅनलसह फॅाक्स वेंट्सवर लाल किंवा सिल्व्हर हायलाईट बघायला मिळणार आहे. 

लाल आणि सिल्व्हर हायलाईटचे व्हेरियंटच्या सीटवर लाल रंगाचे धागे स्टिचिंग केले आहे. सिल्व्हर बाईकमध्ये देखील असंच दिसण्याची शक्यता आहे. 

लिक झालेल्या फोटोनुसार अशी माहिती समोर आली आहे की, कंपनीने या बाईक संदर्भात त्यांच्या ऑफिशियल वेबसाइटवर माहिती दिली नाही. पण डीलर्सकडे बाईक आलेल्या आहेत. या बाईकमध्ये कोणताही तांत्रिक बदल करण्यात आला नाही.

लगेच नियंत्रण

बाईकच नियंत्रण चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. बाईकच्या पुढच्या चाकात २४०mmचा डिस्क ब्रेक आहे. तर, मागच्या चाकात १३०mm चा ड्रम ब्रेक दिला आहे. 

कोणत्या बाईकसोबत होणार स्पर्धा

बजाज पल्सर 150 क्लासिकचा सामना हिरो ग्लॅमर एफआय(६६ हजार ४०० रुपये), हिरो एची १५० ( ६६ हजार १०० रुपये ) आणि पल्सर 135 (64 हजार 489 रुपये) यांसोबत होणार आहे.

बजाज पल्सरची 150 cc बाईक ही बाईक प्रेमींची आवडती होती. या कारणाने कंपनीने बजाज पल्सर 150 क्लासिक याबाईकला नवीन अंदाजात सादर केलं आहे.

Read More