Marathi News> मुंबई
Advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर घातपाताचा कट? मोठी दुर्घटना टळली

मध्य रेल्वेवर मोठा घातपाताचा कट उधळून लावला आहे.   

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर घातपाताचा कट? मोठी दुर्घटना टळली

मुंबई : मध्य रेल्वेवर मोठा (Central Railway) घातपाताचा कट उधळून लावला आहे. रेल्वे ट्रॅकवर खडी भरलेला 20 किलोंचा लोखंडी ड्रम आढळल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. पण मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपाताचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

मोटरमन अशोक शर्मा यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली, त्यामुळे घातपाताचा कट उधळून लावण्यात यश मिळालं आहे. शुक्रवारची ही घटना आहे. दुपारी जेव्हा अशोक शर्मा यांना ट्रॅकवर ड्रम दिसला, तेव्हा त्यांनी लोकल थांबवली आणि 20 किलोंचा लोखंडी ड्रम बाजूला काढला. 

अशोक शर्मा यांच्या सतर्कतेमुळे मोठी  दुर्घटना टळली आहे. या प्रकरणी रेल्वेच्या RPF पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे (Police registered a case). काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या व्हॅट्सऍपवर धमकीची मेसेज आला होता. या पार्श्वभूमीवर ही धक्कादायक घटना आहे. 

पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजनंतर रेल्वे ट्रॅकवर ड्रम आढळला. पण मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर मोठा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

Read More