Marathi News> मुंबई
Advertisement

महायुतीचे मित्रपक्ष कमळाच्या चिन्हावरच लढणार!

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे.

महायुतीचे मित्रपक्ष कमळाच्या चिन्हावरच लढणार!

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. मुदत संपल्यानंतरही भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यात होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत युतीच्या फॉर्म्युलाचा खुलासा झाला. शिवसेना १२४ जागा तर मित्रपक्षांना १४ जागा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या १५० जागा भाजपा लढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजप १५० जागांवर लढणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी मित्रपक्षांच्या उमेदवारांना भाजपानंही एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे मित्र पक्षांच्या १४ जागा भाजपाच्या चिन्हावरच लढवल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान पत्रकार परिषदेमध्येही मित्रपक्षांमधल्या काही जागा भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

भाजपने रामदास आठवलेंच्या आरपीआयला ६ जागा, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला ३ जागा, विनायक मेटेंच्या शिवस्वराज्य संघटनेला ३ जागा आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला २ जागा सोडण्यात आल्या आहेत.

Read More