Marathi News> मुंबई
Advertisement

...हे आहेत राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार

अनेकांची नजर लागलीय ती घाटकोपर पूर्व या मतदारसंघाकडे...

...हे आहेत राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजायला सुरुवात झालीय. यावेळी, अनेकांची नजर लागलीय ती घाटकोपर पूर्व या मतदारसंघाकडे... या मतदारसंघात भाजपाच्या तिकीटावर पराग शाह निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघात तब्बल सहा वेळा निवडून येणाऱ्या प्रकाश मेहता यांना बाजुला सारून यंदा भाजपानं पराग शाह यांना तिकीट दिलंय. उल्लेखनीय म्हणजे, पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पराग शाह यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपत्रपथात ५०० करोड रुपयांच्या मालमत्तेची घोषणा केलीय.  

पराग शाह यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेलं शपत्रपथ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पराग शाह यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे, ७८ करोडहून अधिक किंमतीची स्थावर मालमत्ता आहे. तर जवळपास ४२२ करोड रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे जवळपास २ करोड ६० लाखांहून अधिक किंमतीचे दागिने आहेत. तसंच पराग शाह यांच्या पत्नीच्या नावावर २ करोड ४७ लाखांची POSS, FERARARI गाड्या आहेत. 

fallbacks
पराग शाह

गेल्या ३० वर्षांपासून भाजपाशी प्रामाणिक असणारे आणि घाटकोपर पूर्व मतदारसंघाचं सहा वेळा प्रतिनिधित्व करणारे प्रकाश मेहता मात्र यावेळी तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेत. प्रकाश मेहता दोनदा मंत्रीही राहिलेत. परंतु, यंदा मात्र पक्षानं शेवटच्या क्षणाला मेहतांचं नाव काढून त्याऐवजी पराग शाह यांना संधी दिल्याचं जाहीर केलं. यामागचं आणखी एक कारण म्हणजे, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे प्रकाश मेहता यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं होतं. 

५०० कोटींच्या संपत्तीचे मालक असणारे पराग शाह हे व्यावसायानं बिल्डर आहेत. २०१७ मध्ये भाजपामध्ये दाखल होत त्यांनी पहिल्यांदाच महापालिका निवडणूक लढवली होती आणि त्यात विजयही मिळवला होता. 

Read More