Marathi News> मुंबई
Advertisement

भाजपा नेते प्रकाश मेहता बंडखोरीच्या पावित्र्यात

भाजपा नेते प्रकाश मेहता हे बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहेत.

भाजपा नेते प्रकाश मेहता बंडखोरीच्या पावित्र्यात

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदावरी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. भाजपाच्या चौथ्या यादीत नाव न आल्याने भाजपाचे दिग्गज नेते नाराज आहेत. या पार्श्वभुमीवर भाजपाला मुंबईत बंडखोरीला सामोरे जावे लागणार आहे. भाजपा नेते प्रकाश मेहता हे बंडखोरी करण्याच्या पावित्र्यात आहेत. चौथ्या यादीतही त्यांचे नाव नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.  यांच्याऐवजी पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  पराग शाह हे घाटकोपर पूर्व येथील नगरसेवक आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असे ज्येष्ठ नेते हे सध्या फॉर्म भरण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे प्रकाश मेहता यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. प्रकाश मेहता यांचा पत्ता कट केल्याचे वृत्त कळताच त्यांच्या समर्कांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 

भाजपाची चौथी यादी जाहीर झाली आहे, धक्कादायक म्हणजे एकनाथ खडसे यांचं यादीत नाव नसलं तरी रोहिणी खडसे यांना तिकिट देण्यात आलं आहे. त्यातही आणखी एक धक्कादायक म्हणजे विनोद तावडे, राज पुरोहित, प्रकाश मेहतांचाही पत्ता कट करण्यात आला आहे.

विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तिकडे मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे समर्थक आज शेवटचा निर्णय घेण्यासाठी जमले असताना, रोहिणी खडसे यांना तिकिट देण्यात आलं आहे, तेव्हा यावर एकनाथ खडसे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

भाजपच्या चौथ्या यादीत मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, काटोलमधून चरणसिंग ठाकूर, तुमसरमधून प्रदीप पडोळे, नाशिक पूर्वमधून अॅड. राहुल ढिकले, बोरिवलीतून विनोद तावडे यांच्या जागी सुनील राणे, घाटकोपर पूर्वमधून पराग शहा, तर कुलाब्यातून राहुल नार्वेकर यांना भाजपाने तिकिट दिलं आहे.

Read More