Marathi News> मुंबई
Advertisement

Aryan Khan case : NCBचे समीर वानखेडे अडचणीत, दिल्लीला बोलावले

Aryan Khan case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Aryan Khan case : NCBचे समीर वानखेडे अडचणीत, दिल्लीला बोलावले

मुंबई : Aryan Khan case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लाचखोरीच्या आरोपप्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे दिल्लीत पोहोचले आहेत. समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची चौकशी एनसीबीचे दक्षता पथक करणार आहे. (Aryan Khan case: NCB officer Sameer Wankhede in trouble, called to Delhi ) 

दक्षता पथक तपास करणार

समीर वानखेडे प्रकरणी तीन सदस्यांचे दक्षता पथक तपास करणार आहे. आरोपांच्या चौकशीसाठी टीम आज मुंबईला येऊ शकते, अशी माहिती आहे. एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह तपास पथकाचे नेतृत्व करणार आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे दिल्लीत पोहोचले आहेत. ते एनसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटू शकतात, अशी माहिती आहे.

मुंबई ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे सोमवारी दिल्लीत आले. पण त्यांनी दिल्लीत येण्याचे कारण सांगण्यास स्पष्ट नकार दिला. आर्यन खानशी संबंधित आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे सोमवारी दिल्लीत पोहोचल्याने त्यांची खात्यांतर्गत चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कुटुंबियांना धोका - प्रभाकर साईल 

समीर वानखेडे यांच्यापासून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना धोका असल्याचं प्रभाकर साईल याने म्हटले होते. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी प्रभाकर साईल याने केली होती. तसेच साईलने पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर गुन्हा दाखल होऊ शकेल, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली आहे. एफआयआर दाखल करण्यासाठी कोणीतरी तक्रार करावी लागते. याबाबत तक्रार केली गेली तर पुढे काय करता येईल ते बघता येईल, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, सध्या राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची ट्विट्स चर्चेत आहेत. समीर वानखेडे यांच्या वडिलांचा फोटो रात्री त्यांनी ट्विट केला आणि हू इज धिस वानखेडे दाऊद, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर आज सकाळीही त्यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. आजच्या ट्विटमध्ये एका हिंदी गाण्याच्या ओळी त्यांनी लिहिल्यायत. या ट्विटमध्ये 'एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग' असे त्यांनी म्हटले आहे.

आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान याला बेल की जेल? मिळणार याबाबतचा निर्णय आज होणार आहे. आर्यन खान याच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर होणार का, याकडे लक्ष लागले आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत जामीन नाही मिळाला तर आर्यनची दिवाळी जेलमध्येच जाण्याची शक्यता आहे. वकिल मुकुल रोहतगी हे आर्यनची बाजू मांडणार आहेत.

माजी एटरर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यन याची बाजू न्यायालयात मांडतील. जर 31 ऑक्टोबरपर्यंत आर्यनला जामीन मंजूर झाला नाही तर दिवाळीही आर्यनला जेलमध्येच काढावी लागणार कारण 1 ते 12 नोव्हेंबर न्यायालयाला दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे याआधी एनडीपीएस न्यायालयाने नाकारलेला जामीन उच्च न्यायालय मंजूर करणार का याकडे लक्ष लागले आहे.

Read More