Marathi News> मुंबई
Advertisement

अनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

Anil Deshmukh Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील आनंद डागा (Anand Daga) यांना चौकशीनंतर सीबीआयने (CBI) अटक केली आहे.  

अनिल देशमुख यांच्या वकिलांना सीबीआयकडून अटक

मुंबई : Anil Deshmukh Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे वकील आनंद डागा (Anand Daga) यांना चौकशीनंतर सीबीआयने (CBI) अटक केली आहे. काल वकील आनंद डागा (Anand Daga) यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. दरम्यान, सीबीआयचा अहवाल लिक केल्याप्रकरणी सीबीआयने आपल्याच अधिकाऱ्याला अटक केली आहे. (CBI has registered a case against its Sub Inspector)

जावयाची चौकशीनंतर सुटका तर सीबीआय अधिकाऱ्याला अटक

दरम्यान, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना चौकशीनंतर सीबीआयने (CBI) सोडले आहे. मात्र, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अनिल देशमुख यांच्याविरोधातील अंतर्गत चौकशीचा अहवाल लीक केल्याप्रकरणी स्वतःच्याच अधिकाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान, याआधी बुधवारी रात्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर चौकशीनंतर आता त्यांची सुटका करण्यात आली आहे. चतुर्वेदी वरळीतील सुखदा या इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने ताब्यात घेतले होते. 

अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयकडून रात्री उशिरा अटक केली असून आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. तर सीबीआयने सब इन्स्पेक्टर अभिषेक तिवारी याला यापूर्वी अटक केली आहे. तिवारी आणि डागा यांनी प्राथमिक चौकशी अहवालात फेरफार करून आणि संगनमत करून अनिल डागा यांनी तो अहवाल समाज माध्यमातून प्रसारीत केला आहे, असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार डागा यांना अटक  करण्यात आली आहे.

Read More