Marathi News> मुंबई
Advertisement

Andheri Fire: मृतांच्या आकड्यात वाढ, आगीचं राजकारण सुरू

सहावरुन आता मृतांचा आकडा पोहोचला....   

Andheri Fire: मृतांच्या आकड्यात वाढ, आगीचं राजकारण सुरू

मुंबई :  Andheri Fire अंधेरीतील कामगार रुग्णालयात सोमवारी लागलेल्या आगीत मृतांचा आकडा वाढला असल्याची महिती समोर येत आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या आगीतील मृतांचा आकडा आता ८ वर पोहोचला असून, येत्या काही तासांमध्ये हा आकडा वाढण्याची भीती असल्याचंही कळत आहे. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. 

सध्याच्या घडीला आगीमुळे जळमी झालेल्या जवळपास १७५ लोकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं असून, जखमींमध्येही भीतीचं वातावरण आहे. अंधेरीच्या कामगार रुग्णालयात सोमवारी दुपारी लागलेली आग अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर अखेर नियंत्रणात आली खरी. पण, या आगीमुळे झालेली जीवित आणि वित्त हानी आता चिंतेची बाब ठरत आहे. 

आग इतक्या भीषण स्वरुपाची होती की, परिस्थितीता घाबरत एका महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. ज्यामध्ये त्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर, दुसऱ्या एका रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यानंतर उपचारादरम्यान मृतांचा आकडा वाढतच गेल्याचं स्पष्ट झालं. 

अतिशय मोठ्या स्वरुपातील या दुर्घटनेमधील जखमींना उपचारासाठी कूपर, बाळासाहेब ठाकरे, स्पिरीट आणि सेव्हन हिल्स या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आता राजकीय या आगीमुळे नेतेमंडळींमध्ये भडका उडाल्याचं कळत आहे. 

२००९ पासून संबंधित रुग्णालयाचं फायर ऑडिट करण्यात आलं नसल्याचं माहिती समोर येत आहे.  तर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या आगीचं, दुर्घटनेचं खापर एमआयडीसीवर फोडत शिवसेनेच्याच उग्योगमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यामुळे आता आगीचं राजकारणही अनेक वादांना वाव देत आहे हेसुद्धा नाकारता येणार नाही. 

दरम्यान, या रुग्णालयाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त कऱण्यात आला आहे. सेंट्रलाईज एसीला लागणाऱ्या पुठ्ठ्यामुळे संपूर्ण रुग्णालयात धूर पसरला ज्यामुळे अनेकांनाच त्रास झाला होता. 

 

Read More