Marathi News> मुंबई
Advertisement

अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?

Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.

अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?

Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत. अजित पवार राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना घेऊन शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे आमदार उपस्थित आहेत. 

यावेळी राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राजभवनात दाखल झाले आहेत. नाशिकहून राष्ट्रवादी  आमदार आणि आजोत पवार समर्थक माणिकराव कोकाटे नितीन पवार आणि दिलीप बनकर मुंबईला निघाले आहेत. 

दरम्यान अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 40 आमदार सोबत असल्याचे सांगितले जात आहे. 

महाराष्ट्रातील राजकारणातील प्रत्येक अपडेट - Maharashtra Political Crisis Live: शरद पवारांना शपथविधीची माहिती नाही, अमोल कोल्हेंची माहिती

Read More