Marathi News> मुंबई
Advertisement

बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दम

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वादग्रस्त विधानं करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवारांनी दम भरलाय. 

बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दम

Ajit Pawar : महायुतीच्या नेत्यांची गेल्या काही दिवसांपासून बेताल बडबड करण्याची स्पर्धा लागली आहे. आता याच बेताल नेत्यांविरोधात अजित पवार (Ajit Pawar) आक्रमक झाले आहेत. अजित पवारांनी वाचाळवीर नेत्यांना दमच भरलाय. सत्ताधरी असो वा कुणीही असो वाचाळ वीरांनी भाषा सांभाळावी असा दम अजित पवार यांनी दिला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) तसंच भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी (Anil Bonde) राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधानं केली होती. तर नितेश राणेंसारखे नेते सातत्याने मुस्लिमविरोधी विधानं करताना दिसत आहेत. या वक्तव्यांचा फटका थेट अजित पवार गटाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या पक्षात या नेत्यांबाबत नाराजी असल्याचं समजतंय.. याच वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांची तक्रार अजित पवारांचा पक्ष दिल्लीतल्या वरिष्ठांकडे करणार असल्याचं समजतंय.

भाजप, शिवसेनेचे वाचाळवीर

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसंच भाजप खासदार अनिल बोंडेंचं राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान

महायुतीच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे काँग्रेसला सहानुभूती मिळण्याची शक्यता

नितेश राणेंचीही सातत्याने मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य

मुस्लीम समाज महायुतीपासून दूर जाण्याची भीती

दिल्लीत तक्रार करणार

आता याच नेत्यांच्या बेताल बडबडीला आवर घालावी अशी मागणी अजित पवारांचा पक्ष थेट दिल्ली हायकमांडकडे करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तक्रारीतून अजित पवार हे आपण अजूनही मुस्लीम मतदारांच्या पाठीशी उभे आहोत, असा संदेशही देण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी प्रफुल पटेल, सुनिल तटकरे थेट दिल्लीत नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याची माहिती आहे.

Read More