Marathi News> मुंबई
Advertisement

मुंबईत आणखी एक स्टुडिओ बंद पडणार

सत्तरच्या दशकातला सुप्रसिद्ध असा जोगेश्वरी पूर्वमधला कमालिस्तान स्टुडियो आता बंद पडणार आहे. 

मुंबईत आणखी एक स्टुडिओ बंद पडणार

मुंबई : सत्तरच्या दशकातला सुप्रसिद्ध असा जोगेश्वरी पूर्वमधला कमलिस्तान स्टुडियो आता बंद पडणार आहे. याठिकाणी अनेक हिंदी चित्रपटांसह मराठी चित्रपटांचंही चित्रिकरण झाले होते. मागील काही वर्षांपासून या ठिकाणी लग्न समारंभ आणि खासगी कार्यक्रम होत आहेत. लवकरच या जागेचा पुनर्विकास होणार असून याठिकाणी व्यावसायिक कार्यालयांसाठीची इमारत उभी राहणार आहे. १९५८ मध्ये मुंबईत कमलिस्तान स्टुडिओची स्थापना केली गेली होती.

या स्टुडिओने अनेक हिंदी ब्लॉकबस्टर तयार केले आहेत. सध्या रिअलटी प्लेअर डीबी रियल्टी आणि बेंगळुरू स्थित आरएमझेड कॉर्प आरपीटी आरएमझेड कॉर्प यांनी संयुक्तपणे १५ एकर जागेत देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस पार्कची उभारण्याची तयारी केली आहे. गेल्या महिन्यात पूर्वेकडील उपनगरात आरके स्टुडिओनंतर कमलालिस्ट हा व्यावसायिक चित्रपट तयार करणारा स्टुडिओ म्हणून ओळख आहे.

fallbacks

दरम्यान, मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या दादर पूर्व येथील चित्रा सिनेमा हे टॉकीज कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय सिनेमागृह प्रशासनाने घेतला. जवळपास सात दशकांहून अधिक काळ चित्रपट रसिकांच्या मनोरंजनास सज्ज असणारे हे चित्रपटगृहं बंद झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये निराशा पाहायला मिळाली. हे चित्रपटगृह बंद होऊ नये, म्हणून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, हे टॉकीज बंद झालेय.

Read More