Marathi News> मुंबई
Advertisement

अभिनेत्री जुही चावलाची नवी आयडिया, प्लास्टीकला सूचवला पर्याय

अभिनेत्री जुही चावलाने आपल्या ट्विटर हॅंडलवरून एक पर्यावरणपूरक पर्याय सूचवला आहे. तिने दिलेल्या संदेश हा प्लास्टीकला पर्याय देणारा आहे. तिच्या या पर्यायाचे अनेकांनी स्वागत केले असून, तिच्या ट्विटला यूजर्सनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

अभिनेत्री जुही चावलाची नवी आयडिया, प्लास्टीकला सूचवला पर्याय

मुंबई : अभिनेत्री जुही चावलाने आपल्या ट्विटर हॅंडलवरून एक पर्यावरणपूरक पर्याय सूचवला आहे. तिने दिलेल्या संदेश हा प्लास्टीकला पर्याय देणारा आहे. तिच्या या पर्यायाचे अनेकांनी स्वागत केले असून, तिच्या ट्विटला यूजर्सनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

टाकाऊ वस्तूचाही  योग्य पद्धतीने वापर

जुही चावलाने आपल्या ट्विटर हॅंडलवर एक छायाचित्र शेअर केले आहे. हे छायाचित्र नारळाच्या रिकाम्या शहाळ्याचे आहे. या शहाळ्यांचा तिने योग्य वापर करत आपण टाकाऊ वस्तूचाही कसा योग्य पद्धतीने वापर करू शकतो हे दाखवून दिले आहे. आपल्याकडे पाणी पिऊन झाल्यावर नारळाची रिकामी शहाळी टाकून दिली जातात. जसा की त्याचा काहीच वापर करता येणार नाही.

नारळाच्या रिकाम्या शहाळ्यात रोपटी

दरम्यान, दुसऱ्या बाजूला रोप लावताना सर्ऱ्हासपणे प्लास्टीक बॅगचा वापर केला जतो. नेमकी हीच बाब ओळखत जुहीने हो फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत नारळाच्या रिकाम्या शहाळ्यात रोपटी लावलेली दिसतात. खरेतर प्लास्टीकला पर्याय म्हणून ही कल्पना एकदम झकास आहे. अगदी सर्वांनी प्रत्यक्षात अमलात आणावी अशी. अर्थात जुहीने तर त्या दृष्टीने विचार सुरू केला आहे. पण, तुमचे काय?

Read More