Marathi News> मुंबई
Advertisement

Mankhurd Fire : कचरा माफियांनी आग लावल्याचा संशय

मानखुर्दच्या मंडाळा भागात भंगाराच्या गोदामांमध्ये आगीचे तांडव (Mankhurd Fire) कायम आहे.  

Mankhurd Fire : कचरा माफियांनी आग लावल्याचा संशय

मुंबई : मानखुर्दच्या मंडाळा भागात भंगाराच्या गोदामांमध्ये आगीचे तांडव (Mankhurd Fire) कायम आहे. या आगीत फायर ब्रिगेडचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. ही आग पाच तासांपासून धुमसतेय. दरम्यान, ही आग कचरा माफियांनी लावल्याचा संशय आहे. या आगीमागे मोठे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. ( A fire has broken out at a godown in Mankhurd area of Mumbai)

मुंबईतल्या मानखुर्द भागातील मंडाळा इथं भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. दुपारी 2.40 च्या सुमारास ही आग लागली होती. आगिमुळे आकाशात मोठमोठे धुराचे लोट उठत आहेत. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, यात जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान यात अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे. आग लागून चार तास उलटले तरीही अजून आग धुमसतेय. 

आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र आता परिसरातील वाहतूक कोंडी कमी होत आहे. आग लागून पाच तास उलटले तरीही अजून आग धुमसत आहे. 50 हून अधिक गोदाम जळून खाक झाली आहेत. जवळपास दोन एकर परिसरात आग पसरली आहे. आगीचे लोळ आणि धुराचे लोट कायम असून हवेमुळे परिसरात धूरच धूर दिसत आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु असताना बघ्यांना आवरण पोलिसांना कठीण झाले आहे. कोणतीही जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र, कोट्यवधींची नुकसान झाले आहे.

Read More