Marathi News> मुंबई
Advertisement

८००० किलो शार्क माशाचे कल्ले जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची मोठी कारवाई

८००० किलो शार्क माशाचे कल्ले जप्त

मुंबई : महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मुंबई आणि गुजरातमधून ८००० किलो शार्क माशाचे कल्ले जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान तस्करीची मोठी साखळी उद्धवस्त  करत तस्करांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या ८००० किलो कल्ल्यांपैकी ३००० किलो कल्ले मुंबईतील शिवडी येथील गोदामातून, तर उर्वरित ५००० किलो कल्ले गुजरातमधील वेरावल येथून जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण ४ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

Read More