Marathi News> मुंबई
Advertisement

#75 th Independence day: मंत्रालयात मुंख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण, जनतेला केलं संबोधित

#75 th Independence day स्वातंत्र्यादिनी काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे... वाचा  

#75 th Independence day: मंत्रालयात मुंख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण, जनतेला केलं संबोधित
Updated: Aug 15, 2022, 10:03 AM IST

मुंबई : आज देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि जनतेला त्यांचप्रमाणे अनेक नवीन योजना घोषित केल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर आपलं मत देखील मांडलं. गेल्या साडे तीन वर्षांपासून कोविडच्या विषाणूनं आपल्याला बंधिस्त केलं होतं. संकट अद्याप गेलेलं नाही, पण आपण सगळ्यांनी विषाणूनं घातलेल्या बेड्या तोडल्या आहे... असं मुख्यमंत्री म्हणाले. 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 'स्वातंत्र्य महोत्सवाबरोबरच आपण येणारे सणही काळजी घेऊन जल्लोषात साजरे करू. नवे सरकार आले आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही काम करतोय. 28 जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला असून 15 लाख हेक्टर जमिनीवरील पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 15 हजार नारिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. '

यावेळी राज्याच्या विकासासंदर्भात देखील मुख्यंमंत्र्यांनी माहिती दिली. ' ओबीसी,धनगर,मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. राज्याच्या विकासासाठी नेहमी आम्ही केंद्राशी संपर्कात आहोत. शेती क्षेत्रात आम्ही आमुलाग्र बदल करणार आहोत. असं देखील  मुख्यमंत्री म्हणाले. 

'एक शिक्षकी शाळा राहणार नाही याचे नियोजन करणार आहोत. एक शिक्षकी शाळा राहणार नाही याचे नियोजन करू. एक शिक्षकी शाळा राहणार नाही याचे नियोजन करू. कौशल्य विकासाला प्राधान्य देणार आहोत. असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 

पुढे मुख्यमंत्री म्हणाले, 'गेल्या दीड महिन्यात आम्ही जनहिताचे कामं केली आहेत. शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये प्रोत्साहनपर लाभ आम्ही देत आहोत.' एवढंच नाही तर यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना बुस्टर डोस घेण्यासाठी  देखील आवाहन केलं.